आई

आई - फक्त एक शब्द!!!
आई - फक्त एक स्त्री!!!
आई - फक्त एक व्यक्ती!!!
आई - कधी जिवलग, कधी जीवन,

कधी हलवी, कधी कणखर ,
अपुले जीवन असेल यशस्वी,
तर त्याचा पाया आई!

इतिहासात पन्ना-दाई, जिजाई,
तर वर्तामानात अपुली आई!
कधी गाते गोड़ अंगाई ,
कधी करते कान-उघड्णी ,

जीवानातील कठिण प्रसंगी,
आई-चीच सय येई,
कधी असेल ती कैकयी,
पण तीही अखेर भरताची आई!

कधी मुत्सुद्दी, कधी भोळी,
मुलांच्या ईच्छाना अलगद सांभाळी,
मुलांचे कल्याण सदैव अन्तरी
कुठल्याही संकटाला जाई सामोरी,

नाते नाळेचे जपते मनी,
अशीच असते आपली आई.....
तिच्या बद्दल जीताक लिहाल तीतक कमी,
अशीच असते आपली आई!!!

- प्रज्ञा (13/1/07)

No comments: