जग हे सुंदर आहे, त्याला आणखी सुंदर बनवावे

कधी कधी हसावे, कधी कधी रडावे,
आपण लांब असलो तरी दोन शब्द बोलावे.
प्रेमाला जपावे, प्रेमात राहावे,
जग हे सुंदर आहे,
त्याला आणखी सुंदर बनवावे  || १ ||

मनाच्या कोपर्यात
कुठेतरी स्वप्न सजवावे
त्याचा सुवासात नेहमी दरवळावे
जग हे सुंदर आहे,
त्याला आणखी सुंदर बनवावे  || २ ||

रात्र संपते, सूर्य उगवतो,
नवीन आशा - नवीन दिशा दाखवतो
त्या दिशेच्या आशेवर झुलावे
जग हे सुंदर आहे,
त्याला आणखी सुंदर बनवावे  || ३ ||


No comments: