एक तरी मुलगी असावी

एक तरी मुलगी असावी,
'आई' म्हणून हाक ऐकावी,
प्रेमात माझ्या नखशिखांत,
भिजुन चिम्ब हसावी

एक तरी मुलगी असावी,
उमलताना बघावी,
नाजुक नखरे करताना,
न्याहाळायला मिळावी

एक तरी मुलगी असावी,
साजरी गोजरी दिसावी,
नाना मागण्या पुरवताना,
तारांबळ माझी उडावी

एक तरी मुलगी असावी,
माँचिंग करताना बघावी,
नटता नटता आईला तीने,
खुलण्याची तंत्र शिक्वावी

एक तरी मुलगी असावी,
जवळ येऊन बसावी,
मनातली गुपीत तीने,
हळूच कानात सांगावी

एक तरी मुलगी असावी,
गालातल्या गालात हसावी,
कधीतरी भावनेच्या भारांत तीने,
गळां मीठी घालावी

- आई